I - T H I N K
ललित महाजन • 15 Years of Design
कामाचं बोलूया,
थेऱ्या नंतर कधीतरी प्रत्यक्ष भेटून.
आतापर्यंत केलेली काही कामं

एलिमेंट फार्मास्युटिकल्स
व्हिज्युअल-एड्स, रिमाइंडर कार्ड्स, LBL, वेबसाईट आणि प्रिंटिंगची संपूर्ण जबाबदारी

गुळाचा चहा
चौकाचौकात लांबून उठून दिसणारा चहाच्या दुकानाचा ब्रँड

ग्लिनोर स्कॅफोल्डिंग
कंपनीचा लोगो, ब्रँड ओळख, ब्रोशर्स, इनडोअर ब्रँडिंग आणि सर्व प्रिंटिंगची चोख जबाबदारी

हेयरोवेदा आयुर्वेदिक
आयुर्वेदिक लोगो, ब्रँड ओळख आणि बॉटल्स व खोक्यांचे पॅकेजिंग मॉकअप्स

राजेशाही थाळी
राजेशाही थाळीचा खास लोगो आणि हॉटेलचे संपूर्ण इनडोअर ब्रँडिंग

मेड-रिवाईव्ह बायोटेक
लोगो, ब्रँड ओळख, व्हिज्युअल-एड्स, LBL, रिमाइंडर कार्ड्स, पॅकेजिंग, वेबसाईट आणि सर्व प्रिंटिंगची जबाबदारी

टेबल स्टोरीज
रेस्टॉरंट व बारचा खास लोगो आणि संपूर्ण इनडोअर ब्रँडिंग

बास्क-रे न्यूट्रास्युटिकल्स
न्यूट्रास्युटिकल कंपनीचा लोगो आणि संपूर्ण ब्रँड आयडेंटिटी

मॉडर्न स्टील सोल्युशन्स
लोखंड-स्टील फॅक्टरीसाठी वजनदार आणि नेटकी कंपनी प्रोफाईल

मिझाक स्कॅफोल्डिंग
लोगो, ब्रँड ओळख, कंपनी व प्रॉडक्ट प्रोफाईल आणि सर्व प्रिंटिंगची जबाबदारी

५२ वीकेंड्स कॅम्पिंग
अॅडव्हेंचर कॅम्पिंगचा लोगो आणि कॅम्पसाईटसाठी संपूर्ण आऊटडोअर ब्रँडिंग

आसन फर्निचर्स
फर्निचर ब्रँडचा लोगो आणि संपूर्ण ब्रँड आयडेंटिटी

आय-टूर्स (iTours CRM)
टूर ऑपरेटर्सच्या CRM सॉफ्टवेअरचा लोगो, ब्रँड ओळख आणि ब्रोशर डिझाइन

क्वाड्रंट लाईफसायन्सेस
लोगो, ब्रँड ओळख, व्हिज्युअल-एड्स, रिमाइंडर कार्ड्स, LBL आणि सर्व प्रिंटिंगची जबाबदारी

इन-स्टाईल सलून
सलूनचा लोगो, मेनू कार्ड (रेट कार्ड) आणि प्रचार हँडबिल्स

स्टारेक्स सोलर
सोलर कंपनीसाठी वजनदार आणि नेटकी कंपनी प्रोफाईल

व्हीएमएम (VMM)
इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसाठी वजनदार आणि नेटकी कंपनी प्रोफाईल

बीईंग हेल्दी
हेल्दी फूड ब्रँडचा लोगो, ब्रँड ओळख आणि मील बॉक्सेसचे पॅकेजिंग

सारा कश्यप
अॅडव्हेंचर रायडर आणि अॅथलीटसाठी डॅशिंग पर्सनल लोगो

सुशीला एंटरप्रायझेस
फसाड व इंजिनिअरिंग कंपनीचा लोगो आणि संपूर्ण ब्रँड ओळख

विस्टेरिया हेल्थकेअर
लोगो, ब्रँड ओळख, व्हिज्युअल-एड्स, LBL, रिमाइंडर कार्ड्स आणि वेबसाईट डिझाइन

झेलैनो फार्मास्युटिकल्स
फार्मा कंपनीचा लोगो, ब्रँड ओळख, रिमाइंडर कार्ड्स आणि व्हिज्युअल-एड्स

आरयूव्ही फार्मा
ब्रँड ओळख, व्हिज्युअल-एड्स, रिमाइंडर कार्ड्स, LBL, वेबसाईट आणि सर्व प्रिंटिंग जबाबदारी

मेडीहायम्स फार्मा
फार्मा कंपनीचा कॉर्पोरेट लोगो आणि संपूर्ण ब्रँड आयडेंटिटी

बीच सिम्फनी रिसॉर्ट
रिसॉर्टचा लोगो, ब्रँड ओळख, इनडोअर ब्रँडिंग आणि आकर्षक सायनेजेस
मी नक्की काय करतो?
११ प्रमुख ब्रँड टचपॉईंट्स आणि कोणतीही वेगळी गरज. कोणताही एजन्सी आव किंवा मध्यस्थ नाही, थेट विचार आणि चोख काम.
लोगो आणि ब्रँड ओळख
दोन दिवसांत कॅनव्हावर काढलेली रांगोळी नाही. ५० फुटांवरूनही ओळखता येईल असा पक्का व्हेक्टर लोगो आणि ठरलेली अचूक रंगसंगती.
कंपनी प्रोफाईल आणि ब्रोशर्स
३५ एमबीची गरगर फिरणारी फाईल नाही. मोठ्या साहेबांनी शुक्रवार संध्याकाळी विमानाची घाई असतानाही २० सेकंदांत बघून फोन लावावा असा वजनदार प्रोफाईल.
पॅकेजिंग आणि खोकी
प्रिंटिंग प्रेसवाला कधीही फाईल रिजेक्ट करणार नाही अशा चोख डायलाइन्स. दुकानात वीस स्पर्धकांच्या गर्दीत ग्राहक बोट दाखवून म्हणेल: 'ते लालवालं द्या!'
प्रॉडक्ट कॅटलॉग
फॅक्टरीच्या सामानाची, आकारांची आणि कोड्सची चोख मांडणी. समोरच्या परचेस मॅनेजरला एका नजरेत सगळं समजेल.
ब्रोशर्स आणि फोल्डर्स
कागदाच्या जाडीनुसार (GSM) अचूक घड्या पडणारं ब्रोशर. हाताला कागद लागताच कंपनीची खरी ताकद जाणवली पाहिजे.
बिझनेस कार्ड्स
हलकं कागदी कार्ड नाही. जाड कागद, स्पॉट यूव्ही आणि गोल्ड फॉइल. मीटिंगमध्ये समोरच्याच्या हातात दिल्यावर तो खिशात ठेवण्याआधी दोन सेकंद बघत राहील.
मेनू कार्ड्स
हॉटेलात मंद प्रकाशातही अक्षरं दिसावीत आणि जेवणाचं पाणी किंवा तेल सांडलं तरी पुसून स्वच्छ करता येईल असा टिकाऊ मेनू.
होर्डिंग्ज आणि बिलबोर्ड्स
हायवेवर गाडी ६० च्या स्पीडने जातानाही दोन सेकंदांत डोक्यात बसेल असा बोर्ड. ५० फुटांवरूनही एकही पिक्सेल फाटणार नाही.
बिझनेस पिच डेक
इन्व्हेस्टर्स आणि पार्टनर्ससमोर आकडे आणि पुढची दिशा अगदी आरशासारखी स्वच्छ मांडणाऱ्या स्लाईड्स.
वेबसाईट डिझाइन आणि कोड
अमेरिकन लोकांचे उसने फोटो असलेली खोटी साईट नाही. ०.८ सेकंदात उघडणारी, खरी माणसं दाखवणारी आणि थेट व्हॉट्सअॅपवर कस्टमर आणणारी वेबसाईट.
सोशल मीडिया क्रिएटिव्ह्ज
इंटरनेटवरचे फुकट कॅनव्हा टेम्पलेट्स नाहीत. ब्रँडचं वजन टिकवणारे आणि लोकांनी थांबून बघावेत असे ठसठशीत पोस्टर्स.
काहीतरी भन्नाट किंवा वेगळं?
ब्रँडिंगमध्ये प्रत्येक टचपॉईंट महत्त्वाचा असतो. तुमची गरज या ११ च्या पलीकडची असेल, तरी सांगा. 'थिंकर' म्हणून आधी एकत्र बसून पूर्ण विचार करू, मग डिझाइन आणि फॅक्टरी लेव्हलवर त्याची अचूक अंमलबजावणी करू.
या, फोनवर बोलूया.
थेट ललित महाजन यांच्याशी बोला. मध्ये कोणताही सेल्समन, एजंट किंवा ज्युनियर ट्रेनी नाही.